spot_img

प्रमोशन ! गजानन धांडे बनले शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक

बुलढाणा, 12 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठकीत गजानन धांडे यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठक रविवारी १२ जुलै बुलढाणा रेसिडेन्सी येथे उत्साहात पार पडली. बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, राज्यप्रवक्ता जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, जिल्हा संघटक सुमित सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, वसंतराव झाल्टे, यांच्यासह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख व अंतर्गत संघटनांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत जिल्हाभरात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक शिवसैनिकाला सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत