बुलढाणा, 15 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी)ः बिल काढून देण्यासाठी एकुण रकमेच्या 3 टक्के लाच घेतांना जळगांव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. आज दुपारी 12 वाजेदरम्यान त्यांच्याच कार्यालयात लाचेची रक्कम स्विकारतांना ते रंगेहाथ पकडले गेले. विशेष म्हणजे अमरावतीच्या एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे. एका जणाचे 8.50 लाख रूपयांचे बिल काढून देण्यासाठी मोरे याने 3 टक्के लाच मागितली होती. लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे संबंधीताने थेट अमरावती एसीबीला संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानंतर एपीआय स्वप्नील निराळे यांच्या पथकाने सापळा रचला. लाचखोर मोरे त्यात अडकला. मोरेविरोधात अटकेची कारवाई सुरु असून सविस्तर माहिती आपण आजच्या गुड इव्हिनिंग सिटीच्या अंकात वाचू शकाल.




