बुलढाणा, १९ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः तुम्ही जर बुलढाणा शहरात दारू पिवून वाहन चालवित असाल तर तुम्हाला पोलिस कारवाईचा सामना करावा लागू शकतो. याचे कारण म्हणजे एसपी निलेश तांबे यांच्या आदेशाने ठाणेदार संग्राम पाटील यांनी अपघात टाळण्यासाठीच्या विविध उपाययोजनांवर वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी फॅन्सी नंबरप्लेट, कर्णकर्कश हॉनवाली वाहने तसेच फटाकडे सायलेन्सवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे. आता ट्रॅफिक पोलिसांकडे ब्रेथ ऍनेलायझर मशीन देण्यात आली असून यात दोषी आढळणार्या वाहनचालकाविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वरवंट येथील गजानन नारायण लवंगे (वय ३६) ला शहरातील संगम चौकात पोलिसांनी थांबविले. तो एमएच २८ एडब्ल्यू ९६३० क्रमाकांच्या हिरो डिलक्स मोटरसायकलवर होता. पोलिस कर्मचारी दिनकर वाघ आणि त्यांच्यासोबत असलेल्या पंचाला गजाननच्या तोंडाचा आंबट आणि उग्र वास आला. त्याची ब्रेथ ऍनॅलायझर मशीनद्वारे टेस्ट केली असता रिपोर्ट २९२.२ एमजी मिळाला. जो वाहनचालकाच्या मद्यप्राशनाचे संकेत देतो. सामान्यांची टेस्ट ० ते १० पर्यंत येवू शकते.
थोड्याच वेळानंतर याचठिकाणी राजेंद्र गोवींद कापडे (वय ४०) यांनाही थांबविण्यात आले. त्यांचा वाहन क्रमांक एमएच २८ झेड ४२७६ होता. कापडे ब्रेथ ऍनॅलायझर टेस्टमध्ये ८९.८ एमजी ठरले. अर्थातच कापडे आणि लवंगे या दोघांनाही दारू पिवून गाडी चालविण्याचे रिपोर्टकार्ड मिळाले. बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला दोन्ही वाहनचालकांविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ मोवाका १९८८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. एएसआय गजानन नाटेकर यांच्याकडे दोन्ही घटनांचा तपास देण्यात आला आहे. ेे




