spot_img

डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा बँकेवर बिनविरोध

बुलढाणा, 28 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक पदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर जिल्हा बँकचे पहिले खाते राज्याचे माजी मंत्री डॉ. शिंगणे यांनी उघडले आहे. अर्ज छाननी नंतर ब प्राथमिक कृषी पतसंस्था सिंदखेड राजा तालुक्या मधून डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे हे बिनविरोध निवडून आले असून दत्तात्रय विनायकराव देशमुख यांच्या अर्ज माघारी नंतर डॉक्टर राजेंद्र शिंगणे विजय घोषित करण्यात आले आहे. परंतु‌ डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे सहकारात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. राज्याचे सहकार नेते म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते. परंतु आज डॉ. राजेंद्र शिंगणे बिनविरोध निवड झाली आहे. परंतु आता बाकीच्या संचालकांसाठी कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडते ते बघावं लागेल. पण सर्वात महत्वाचे पॅनल महाविकास आघाडी आणि महायुतीचे होईल किंवा वेगळी आघाडी अस्तित्वात येईल हे येणाऱ्या कालावधीत स्पष्ट होईल. अर्ज मागे घेण्यासाठी बराच मोठा कालावधी दिला असल्यामुळे अजून घोडे मैदान दुर आहे.
संचालक पदांसाठी २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. छाननी व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १२ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे


spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत