spot_img

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी महिलेने एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म!

बुलढाणा:  या बातमीकडे आपण जरी आश्चर्याच्या भावनेने पाहत असू तरी सदर आदिवासी महिलेची घरीच प्रसूती होणे आणि याबाबत संबंधित आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ असणे, हा प्रकार राज्याच्या आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगत आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील चारबन या आदिवासीबहुल छोट्या गावात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. रियाणी पंशाराम सस्त्या (वय २७) या महिलेने घरातच झालेल्या मुदतपूर्व प्रसूतीमध्ये एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये ३ मुले आणि १ मुलगी आहे.

कोणत्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना प्रतिकूल परिस्थितीत ही प्रसूती सुखरूपपणे पार पडल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रसूतीनंतर मातेसह नवजात चारही बाळांना जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
वैद्यकीय तपासणीत मातेसह बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आले; मात्र प्रसूती मुदतपूर्व झाल्याने व नवजात बाळांचे वजन प्रत्येकी केवळ ९०० ग्रॅमच असल्याने अतिदक्षतेच्या आवश्यक उपचारासाठी माता व चारही बाळांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रियाणी सस्त्या या महिलेला याआधी २ मुली व १ मुलगा असून आता कुटुंबातील अपत्यांची संख्या एकूण ७ झाली आहे. एकाच प्रसूतीमध्ये चार बाळांचा जन्म होण्याची घटना ही दुर्मिळ असल्याने लोकांमध्येही कुतूहल व्यक्त होत आहे. तिच्या पतीचे नांव पंशीराम सस्त्या आहे. तो एक सामान्य शेतकरी आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत