spot_img

मलकापूरचा आरोपी जिल्हा रुग्णालयातून फरार*

◾ पोलिसांच्या हातावर तुरी, पळून गेला आरोपी बावरी

 

बुलढाणा, 7 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : मलकापूर दसरखेड एमआयडीसी पोलिसांची झोप आज पहाटे 3:30 वाजेपासून उडाली आहे. बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना मलकापूरच्या आरोपीने पलायन केले आहे. पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल, रविवारी एमआयडीसी परिसरामध्ये तार चोरतांना आरोपी प्रताप सिंग सुरज सिंग बावरी वय 19 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी मलकापूर याला लोकांनी पकडले होते. त्याला बेदम चोप देण्यात आला होता. त्यानंतर सदर आरोपीला मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी आणले होते. डॉक्टरांनी त्याला भरती करून घेतले होते. सर्वजण झोपेत असताना आरोपी बाबरी याने पहाटे 3:30 वाजेपूर्वी त्याच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पळ काढला. आरोपी फरार झाल्याचे समजल्यावर एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत