spot_img

निलेश गुजर आणि ऍड. सुनील देशमुख यांच्यात वाद पेटला 

◾ गुजर यांच्यावर खंडणीचा तर देशमुख यांच्यावर हल्ल्याचा गुन्हा दाखल

बुलढाणा, 2 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : भाजप नेते सुनिल देशमुख आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. बुलढाणा शहरातील गजानन महाराज चौकात दोघांमध्ये वाद होऊन निलेश गुजर यांनी शिवीगाळ व खंडणींची मागणी केल्याची तक्रार बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. निलेश गुजर यांच्यासह इतर तिघा जणांवर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर देशमुख यांनी गाडी अडवून हल्ला केला आणि गुजर यांचे सहकारी परमेश्वर यांना चाकू मारून जखमी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. अर्थात दोघांमध्ये राजकीय वादातून भांडण की, वैयक्तिक भांडणातून राजकीय वाद, याचा शोध सुरु आहे. धाडमध्ये मागच्या महिन्यात झालेली दहीहंडी या वादाच्या केंद्रस्थानी आहे का? याचाही अर्थ आपआपल्या परीने जो तो काढत आहे. नेमके भांडण काय, हे दोघांच्या नेत्यांना नक्कीच माहित असेल पण कागदावर ज्या तक्रारी आहेत, आम्हांला त्याचीच बातमी बनवावी लागणार आहे. दोन्हीकडून राजकीय मंडळीने पोलिस ठाण्यात गर्दी केली होती, हे विशेष.

 

असो, अॅडव्होकेट सुनिल देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सुनिल देशमुख यांचा मित्र अनिल बोराडे यांना निलेश गुजर भेटले व देशमुख यांना कॉल करायचे सांगितले कॉल वर बोलताना निलेश गुजर यांनी पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर देशमुख यांनी निलेश गुजर यांना बुलढाण्याला या आपण बोलू असे सांगितले. निलेश गुजर बुलढाणा शहरातील गजानन महाराज चौकात दाखल झाल्यानंतर देशमुख यांना‌ १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बोलवून घेतले. एका दुकानात गेल्यानंतर देशमुख आणि निलेश गुजर यांच्यात वाद झाला. निलेश गुजर यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. “तुला जिवंत कसा राहतो ते मी पाहतो” अशी धमकी दिली. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास ॲट्रॉसिटीचा किंवा विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी निलेश गुजर आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सदाशिवराव कदम करत आहेत.

 

देशमुख यांनी गुजरवर हल्ल्याची तक्रार 

इकडे गुजर यांचे मित्र अमोल परमेश्वर यांनी पोलिसांना सांगितले की, रात्री 8:30 वाजता ते आणि गुजर गजानन महाराज मंदीर चौकात ऍड. देशमुख यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी गुजर आणि देशमुख यांच्यामध्ये बोलचाल होऊन वाद झाल्याने तो मिटवण्यासाठी गजानन महाराज मंदिर चौक बुलढाणा या ठिकाणी आलो होतो तेव्हा देशमुख यांनी गुजर यांना म्हटले की, तू धाड सर्कल मध्ये जास्त माजला का? तू कोणाच्या भरोशावर कुदतो असे म्हणून आम्हांला शिवीगाळ केली आम्ही तिथून निघून जात असताना 15 मिनिटानंतर सुमारास राधिका होटेल जवळ रोडवर आमची गाडी अडवली. सोबत आणखी तीन अनोळखी इसम होते. सर्वांनी आम्हांला मारहाण करून मला चाकू मारला. नंतर गुजर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली व थार गाडीतून निघून गेले. परमेश्वर याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर हे आमदार संजय गायकवाड यांचे कट्टर समर्थक आहेत. तर भाजप नेते सुनिल देशमुख हे श्वेता महाले यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे आता वाद अजून टोकाला जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. रात्री पोलिस स्टेशनमध्ये भाजपकडून मुन्ना बेंडवाल, मंदार बाहेकर, ऍड. मोहन पवार सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवसेनेकडून ओमसिंग राजपूत, पृथ्वीराज गायकवाड, बबलू मावतवाल सहित कार्यकर्ते दाखल झाले होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत