spot_img

दाभाडी प्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार ◾ “बाहेरवाली” मुळे डॉक्टरने घेतला “घरवाली” चा जीव

बुलढाणा, 30 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजितसिंग राजपूत ) : आठ दिवसांपूर्वी गुड इव्हिनिंग सिटी ने प्रकाशित केलेली दाभाडी प्रकरणाबाबतची “धक्कादायक कलाटणी” ही बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. बायकोच्या सख्या नात्यातील एका तरुणीसोबत डॉक्टरचे अनैतिक संबंध सौ माधुरी टेकाडे हिचा जीव घेणारे ठरले. आरोपी डॉक्टर गजानन टेकाडेने बाहेरवालीसाठी घरवालीचा उशीने दाबून खून केला. बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉक्टर गजानन टेकाडे याला अटक केली असून त्याला आज न्यायालयासमोर उपस्थित केले जाणार आहे. दाभाडी प्रकरण म्हणजे दरोडा असल्याचा बनाव करण्याचा आरोपी डॉक्टरने खूप प्रयत्न केला परंतु आरोपी किती हुशार असला तरी कुठले ना कुठली चूक करतोच. आणि ही चूक बोराखेडी पोलिसांनी अचूक हेरली.

खूनामागची पार्श्वभूमी
डॉक्टर गजानन टेकाडे दाभाडी परिसरातील प्रथित यश पशुवैद्यकीय चिकित्सक आहे. या भागात डॉक्टरचे चांगलेच वजन आहे. माधुरी सोबत लग्न झाल्यानंतर पुढच्या पाच ते सहा वर्षानंतर डॉक्टरचे बायकोच्या नात्यातील एका तरुणीसोबत अनैतिक संबंध सुरु झाले. या तरुणीचे आणि डॉक्टरचे मागील दहा वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. या बाहेरवालीचे डॉक्टरकडे नेहमी येणे-जाणे असायचे. ती मुक्कामी पण राहायची. दोघांच्या या संबंधाने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत. एवढ्या की डॉक्टरने सदर तरुणी सोबत “नको त्या अवस्थेत” काही फोटोज आणि व्हिडिओसुद्धा काढलेले असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून गुड इव्हिनिंग सिटीला मिळाली. या तरुणीवर घरच्यांकडून लग्नासाठी दबाव वाढत चालला होता. पण तिने आरोपी डॉक्टरवर लग्नासाठी दबाव टाकणे सुरु केले. “माझी लाईन क्लिअर करा…लग्न करा नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन”, अशी तंबी तिने डॉक्टरला दिली. ही याच महिन्यातील गोष्ट आहे. तेव्हापासून डॉक्टरच्या डोक्यात बायकोविरोधात कटकारस्थान सुरु झाले. माधुरीला संपवून टाकू, या कुविचाराने त्याच्या मनात पक्के घर केले होते.

असा केला खून…
17 जानेवारीला मुलीचा वाढदिवस होता. पण शिर्डी येथे त्याच दिवशी शालेय लंगडी स्पर्धेसाठी मुलीला जाणे आवश्यकत असल्यामुळे एक दिवस आधीच म्हणजे 16 जानेवारीला टेकाडे कुटुंबाने मुलीचा वाढदिवस साजरा केला. तिला शिर्डी येथे रवाना करण्यासाठी आरोपी डॉक्टर गजानन आणि त्याची पत्नी सौ. माधुरी दोघेही मलकापूर रेल्वे स्टेशनवरही गेले होते. यादरम्यान डॉक्टरच्या मनात बायकोला संपवण्याची षडयंत्र सुरू होते. मलकापूरहून दाभाडीला परत येत असताना डॉक्टरने बायकोला कारमध्येच बसवले आणि एका मेडिकल स्टोअर्स मधून झोपेच्या गोळीचे चार पॉकेट घेतले.

ॲसिडीटी म्हणून बायकोला दिल्या झोपेच्या गोळ्या!!

मुलीला सोडून घरी परतल्यानंतर डॉक्टर ने त्यादिवशी काहीच केले नाही. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 जानेवारी रोजी झोपेच्या गोळ्यांचे एक पूर्ण पॅकेट फोडले… त्यातील दहा गोळ्या काढल्या आणि त्यांचा भुगा तयार केला. बायको माधुरी समोर त्यांनी एक ऍसिडिटीचे चूर्ण काढले. ते चूर्ण पाण्यात मिसळताना तिची नजर चुकवित झोपेच्या दहा गोळ्यांचा भुगा त्या पाण्यात मिसळला. माधुरीने ऍसिडिटीची औषध म्हणून ते पाणी पिले. ही गोष्ट दुपारी 1 वाजेची आहे. तिला माहित नव्हते की डॉक्टरने तिच्यासाठी मृत्यूच्या झोपेची सोय करून ठेवली आहे. औषध घेतल्यानंतर माधुरी दुपारीच गाढ झोपली. डॉक्टरने तिला सायंकाळी चार वाजे दरम्यान उठवले. नंतर संध्याकाळी 6 वाजेदरम्यान तिला उठवून डॉक्टर आणि दोघांनी थोडे जेवले. पण त्याही वेळेस माधुरी ही गुंगलेली होती. केवळ 5 ते दहा मिनिट जागुन डॉक्टरची बायको पुन्हा झोपली.

रात्री 10:30 वाजता केला खून
डॉक्टरची योजना सफल होत होती. आरोपी डॉक्टर गजानन टेकाळे खाली उतरला त्यांनी हातात ग्लोब्स घातले आणि बेडरूम मध्ये गेला. गाढ झोपलेल्या आपल्या बायकोच्या तोंडावर उशी दाबली. माधुरी तडफडू लागली… काही क्षणात ती शांत झाली. पण माधुरी खरंच मेली की नाही, याची खातरजमा करण्यासाठी डॉक्टरने पुन्हा एकदा आपल्या दोन्ही हातांनी माधुरीचे नाक आणि तोंड दाबले. माधुरीचा जीव गेलेला होता.

मग केला दरोड्याचा बनाव!!
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार थोड्या वेळानंतर डॉक्टरच्या डोक्यातील शैतान शांत झाला होता. आपल्या हातून हे काय झाले, असा पश्चाताप त्याला येत होता. आता आपण यातून कसे वाचू असा विचार आल्यानंतर त्याने या संपूर्ण प्रकरणाला दरोड्यात रूपांतरित करण्याचे ठरवले. बायकोच्या अंगावरील सगळे दागिने काढून त्याने कुठेतरी लपवले. ग्लोव्हज जाळून टाकले. दरवाजा उघडा ठेवून कपाट अस्ताव्यस्त करीत कपाटातील सर्व सामान इतरत्र फेकले त्यानंतर त्याने खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या खाऊन घेतल्या. आणि मग 19 तारखेच्या सकाळी डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी दरोडा झाल्याची पाहिली बातमी सर्वत्र पसरली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत