spot_img

‘अप्सरा आली’ फेम सोनाली कुलकर्णी शुक्रवारी बुलढाण्यात

बुलढाणा, 26 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : महाराष्ट्र सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 28 मार्चला बुलढाण्यात येणार आहे. राजमाता महोत्सव 2025 चे आयोजन बुलढाणा येथे करण्यात आले आहे. 28 फेबु्रवारी ते 4 मार्च 2025 पर्यंत ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या माध्यमातून विभागीय, जिल्हा व मिनी सरस ग्रामीण सृजनशीलतेचं भव्य प्रदर्शन व विक्री राजमाता महोत्सव 2025 मध्ये होणार आहे. जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन 28 फेबु्रवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता होणार आहे.
यादरम्यान शुक्रवार, दिनांक 28 फेब्रुवारीते 4 मार्च पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 फेबु्रवारी रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही बुलढाण्यातसायंकाळी 6 वाजता येणार आहे. ए.जे.डान्स गृप यांच्या नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बापू चव्हाण प्रस्तुत गजर महाराष्ट्राचा (महाराष्ट्रातील सर्व लोेककलेचा संगम) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविववार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता स्वप्निल आराख प्रस्तुत स्वर मिलाप ऑर्केस्ट्रा यांचा धमाकेदार हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सोमवार दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचा युवाशाहीर विक्रांतसिह राजपूत यांचा महाराष्ट्राचा शाहीरीबाणा, पोवडे व स्फुर्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी  दुपारी 12 वाजता अभिनेता रोहन पाटील आगामी मराठी चित्रपट सुनबाई लय भारी ची सर्व टीम यांची उपस्थिती राहणार आहे.  
या दरम्यान खाद्यप्रेमींसाठी महाराष्ट्रातील विविध भागातील प्रसिध्द खाद्य हे खाद्यजत्रेच्या माध्यमातून मिळणार आहे.
 या कार्यक्रमाची सांगता 4 मार्च रोजी होणार आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत