एसपी तांबे यांनी कुणावर दिली जबाबदारी बघा
बुलढाणा, 22 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा पोलिस अधीक्षक पदी निलेश तांबे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पोलिस कर्मचारी व पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. बुलढाणा जिल्हा नियंत्रण कक्ष येथे रूजू असलेल्या चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नांदुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांची बदली वर्धा येथे झाल्यानंतर तेथील ठाणेदार पद रिक्त झाले होते. जयवंत सातव यांची पोलिस स्टेशन नांदुरा ठाणेदार पदी बदली करण्यात आली आहे. पोलिस स्टेशन मलकापूर ग्रामीण येथे पोलिस निरीक्षक हे पद मंजुर झाल्यामुळे तेथील ठाणेदार पद रिक्त होते. सतिष महल्ले यांची पोलिस स्टेशन मलकापूरच्या ठाणेदार पदी बदली झाली आहे. खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजयकुमार चव्हाण यांची बदली झाल्यानंतर तेथील ठाणेदार पद रिक्त झाले होते. किशोर तावडे यांची पोलिस स्टेशन खामगाव ग्रामीण ठाणेदार पदी बदली करण्यात आली आहे. तर बोराखेडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांची नंदुबार येथे बदली झाल्यानंतर तेथील ठाणेदार पद रिक्त झाले होते. सिताराम मेहेत्रे यांची पोलिस स्टेशन बोराखेडीच्या ठाणेदार पदी बदली झाली आहे. पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी 21 जून रोजी चार पोलिस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले आहे.
येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी व सण उत्सव यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा राखण्याची जबाबदारी संबंधित ठाणेदार यांच्या वर राहणार आहे.