बुलढाणा, 1 जून (गुड इव्हिनिंग सिटी): ब्रिटीश काळापासून प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. 162 किलोमिटरच्या रेल्वे मार्गाच्या भूमी अधिग्रहणासाठी शासनाने राजपत्र काढले आहे. गेल्या महिन्यात खामगाव-जालना रेल्वे मार्गा संदर्भात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. रेल्वे मार्गासंदर्भात अंतिम मंजुरातीची बातमी बुलडाणेकरांना मिळणार आहे .
बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्वकांशी असा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गासाठी लागणारा ५० टक्के निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूदही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर या संदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी ५० टक्के आर्थिक निधीची तरतूद संदर्भात पाठपुरावा सुरु आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बाबत सकारात्मकता दर्शवली होती. केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला तत्वतः मान्यता दिली. महाराष्ट्र सरकारकडूनही ५० टक्के निधीची तरतूद करून यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे या रेल्वेमार्गा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत केंद्र सरकारचा ५० टक्के हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता .या प्रस्तावावर अंतिम निर्णय होऊन गोड बातमी जिल्हा वासियांना मिळाली आहे.



