spot_img

शिंगणे पाठोपाठ प्रतापराव जाधवही बिनविरोध

बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे भविष्य स्पष्ट

बुलढाणा, 29 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. बुलढाणा लोकसभेचे खासदार आणि विद्यमान केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची संचालक म्हणून निवड झाली आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यामधून तीन जणांनी अर्ज दाखल केला होता. प्रतापराव जाधव यांचे बंधू माधवराव जाधव व दत्तात्रय शेळके यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रतापराव जाधव यांची संचालक पदी वर्णी लागली आहे. प्रतापराव जाधव यांनी या आधी बुलढाणा केंद्रीय सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला आहे. प्रतापराव जाधव यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री व आता विद्यमान केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून कामकाज बघत आहेत. कालच, दत्तात्रय देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे बिनविरोध झाले आहेत. आज, दत्तात्रय शेळके यांनी माघार घेऊन प्रतापराव जाधव यांचा मार्ग सुकर केला. योगायोग म्हणजे डॉ. शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांच्यासाठी माघार घेणाऱ्या दोघांची नावे “दत्तात्रय” आहे. दोघांनाही “दत्त पावला” असे म्हणायला हरकत नाही.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत