spot_img

कोर्टात तंबाखू खाऊन थुकणार्‍याला दणका… डायरेक्ट गुन्हा दाखल

कोर्टात तंबाखू खाऊन थुकणार्‍याला दणका… डायरेक्ट गुन्हा दाखल

बुलढाणा, 3 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : तोंडात तंबाखू पान मसाला खाऊन पिचकाऱ्या मारणार्‍यांची आपल्या देशात कमी नाही. कुठे पण जा मग बस स्टँड असो की सरकारी कार्यालय सगळीकडे भिंती रंगवत असतात. पण अशा लोकांना किती ही बोर्ड लावले तरी जरब बसत नाही. काही ठिकाणी तर दंड वसूल केला जाईल अशा प्रकारचे फलक आहेत पण त्याचा ही काही उपयोग होत नाही. पण कोर्टात थुंकणार्‍याला याची शिक्षा भेटली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, खामगाव दालनात थुंकून, धूम्रपान करून सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास अजय सुखदेव तायडे, रा. म्हाडा कॉलनी, शेगाव रोड, खामगाव हा जिल्हा व सत्र न्यायालय, खामगाव यांच्या दालनात थुंकून, धूम्रपान करून घाण करत असल्याचे निदर्शनास आले. न्यायाधीशांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सार्वजनिक आणि न्यायालयीन ठिकाणी असे गैरकृत्य केल्यामुळे त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ११५ व ११७ अन्वये इस्तेगाशा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार मनोहर गोरे पुढील तपास करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत