संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
बुलढाणा, 4 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : लेखक प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती आंबी यांनी संजय गायकवाडांविरोधात कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या कथित विनयभंगाच्या आणि धमक्यांच्या प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. आरती आंबी यांनी म्हटले आहे की, संजय गायकवाड यांनी बलात्काराची धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, “तुमच्या घरी शंभर पुरुष पाठवतो” असे धमकावणे आणि ३६ अश्लील शिवीगाळ करणे अशा गंभीर कृत्यांमध्ये सहभाग घेतला आहे. यानंतरही अद्याप कोणतीही एफआयआर दाखल झाली नाही यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आरती आंबी यांच्या म्हणण्यानुसार, कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्यांना न्याय मिळण्याची आशा आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्या संजय गायकवाडांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी देणे, महापुरुषांचा अपमान करणे आणि जातीय तेढ निर्माण करणे या आरोपांखाली तक्रार दाखल करणार आहेत. त्यांनी या प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.





Total Users : 1375796