बुलढाणा, 5 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत ) : सत्तेत असलेले कशा प्रकारे कायदे मोडतात आणि यंत्रणेला आपल्या मुठीत ठेवतात, हे आपण पाहतोय. परंतु बुलढाण्यात मात्र यापेक्षा वेगळे चित्र आहे. आजच्या घटनेतून ते समोर आले आहे.
मलकापूर बुलढाणा चिखली हा राष्ट्रीय महामार्ग अधिक प्रशस्त होत आहे… त्या अनुषंगाने कालपासून चिखली रोडवरील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे… महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दिवंगत डॉक्टर राजेंद्र गोडे यांचे निवासस्थान सुद्धा चिखली रोडवर आहे. त्यांच्या कंपाउंड वॉलचा एकीकडचा केवळ 2 फुटाचा भाग अतिक्रमणमध्ये असल्यामुळे आज काढण्यात आला. भाजप नेते योगेंद्र गोडे यांनी कुठल्याही प्रकारची आडकाठी न करता जनहिताचा व्यापक दृष्टिकोन ठेवून कार्यवाहीला मोकळा मार्ग करून दिला. हाच कित्ता खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे बंधु ऍड. उल्हासराव जाधव यांनीही गिरवला. गोडे यांच्या बाजूला ऍड. उल्हासराव यांचे तारेचे कंपाउंड आहे. केवळ एका फुटाचे अतिक्रमण असलेले हे कंपाउंड सुद्धा काढण्याची तयारी त्यांनी दर्शविली. सत्तेत असूनही या दोघांनीही कायद्याचा जो सन्मान केला, त्याची चर्चा आज शहरात सर्वत्र होतेय. अशी मोठी माणसे जर आपले अतिक्रमण काढून घेत असतील तर इतर अतिक्रमण धारकांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या अतिक्रमण काढून घेतले पाहिजे, अशी अपेक्षा करणे गैर नाही.





Total Users : 1379015