spot_img

दुष्काळ…. चोरांसाठी सुकाळ!! बिरसिंगपूर शिवारातून 12 बकऱ्या चोरी

बुलढाणा, 30 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : यात शंका नाही की दुष्काळी परिस्थितीमुळे भुरट्या चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दुष्काळामुळे नवीन चोर तयार होतील हे विदारक सत्य आहे. बिरसिंगपूर शिवारात एका गोठ्यातून मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा बकऱ्या चोरण्यात आले आहेत. बकऱ्या चोरणारे अट्टल चोर आहेत की नवीन चोर आहेत याविषयी माहिती नाही परंतु शेतकरी गजानन शिंदे यांचे मोठे नुकसान झाले आहे. देऊघाट रस्त्यावर बिरसिंगपूर शिवारात नवीन पेट्रोल पंपाच्या जवळ गजानन तोताराम शिंदे यांची शेती आहे या शेतीमध्ये बांधलेल्या गोठ्यात त्यांचे गुरेढोरे असतात. रात्री बारा वाजेपर्यंत शिंदे शेतात होते. नंतर ते घरी परतले सकाळी जेव्हा ते शेतात पोहोचले तेव्हा गोठ्यातून दहा ते बारा बकऱ्या गायब झालेल्या होत्या. अर्थात बकऱ्या चोरीला गेलेल्या होत्या. पहाटे 2 ते 3 वाजेदरम्यान बकऱ्यांची चोरी झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे यांनी सदर चोरीची ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. ठाणेदार श्री रोही यांनी तात्काळ आपले एक पथक घटनास्थळाकडे रवाना केले आहे. दुष्काळामुळे बाजार ठप्प आहे. आर्थिक स्थिती खराब झाली आहे. निश्चितच याचा परिणाम भुरट्या चोऱ्या वाढण्यावर होईल. या दुष्काळाने पोलिसांची जबाबदारी वाढविली असून शेतकऱ्यांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. उरल्या सुरल्या पिकांचीही चोरी होऊ शकते. आपले जनावरे सांभाळून ठेवा. चोर आता सक्रिय झाले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत