महाविकास आघाडीकडू
न संविधान बचाओ मार्च

हे आता सिद्ध झाले आहे की, भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने चालू असलेली SIR प्रक्रिया पूर्णतः संशयास्पद आहे. यामध्ये…….
1. *मतदार वगळण्याचे षडयंत्र :* गरीब, दलित, अल्पसंख्यांक आणि विरोधी विचारांच्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात आहेत. हे भारतीय संविधानाच्या कलम 326 चे उल्लंघन आहे.
2. *निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका :* मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने सत्ताधारी भाजपाला मॅनेज करण्याचे काम केले आहे. आयोगाची स्वायत्तता संपुष्टात आली आहे.
3. *पारदर्शकतेचा अभाव :* SIR प्रक्रियेत BLO वर दबाव, कागदपत्रांची मनमानी मागणी आणि कोणतीही पूर्वसूचना न देता नावे वगळणे – हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.
लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग हा पंच असतो, तोच जर एका पक्षाचा खेळाडू बनला तर निवडणुका स्वतंत्र कशा होतील? त्याकरिता आमची मागणी आहे की,
1) देशभरातील SIR प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी आणि सर्वपक्षीय समितीमार्फत चौकशी करावी.
2) मतदार याद्यांमधून वगळलेली सर्व नावे तात्काळ पुनर्स्थापित करावीत.
3)या संपूर्ण घोळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, किंवा त्यांना पदावरून बडतर्फ करावे.
आम्ही महाविकास आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने महामहीम राष्ट्रपती महोदयांना विनंती करतो की आपण वरील सर्व गंभीर बाबींवर लक्ष देऊन भारतीय संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावेत ही विनंती.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, प्रसेनजित पाटील, जिल्हाप्रमुख शिवसेना जालिंदर बुधवत ,गजानन वाघ, जयश्रीताई शेळके संगीतराव भोंगळ, बीटी जाधव ,पीएम जाधव, लक्ष्मणराव भुमरे, दत्ता पाटील ,दीपक रिंढे, सुनील सोनवणे, बाळासाहेब पवार, वर्षाताई इंगळे, नाझीमाताई खान, यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





Total Users : 1417912