spot_img

आमचा बाप बांधावर, आम्ही रस्त्यावर

बुलढाण्यातही एमपीएससी विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश! 

बुलढाणा ७ ऑक्टोबर ( गुड इव्हीनींग सिटी ):  आरोग्य निरीक्षक पदाचा पेपर फुटल्यानंतर, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी करत पुणे येथे आंदोलन सुरू केले आहे. रोहित पवारांनी या आंदोलनात पुढाकार घेतल्याने आंदोलनांना मोठा पाठिंबा मिळत आहे.  मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसाद आता बुलढाण्यातही उमटले आहेत. आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी धडक दिली. यावेळी विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश पाहायला मिळाला. ‘आमचा बाप बांधावर, अन् आम्ही रस्त्यावर असे सांगत परीक्षांमधील गैरप्रकार खपवून घेणार नाही, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. इतकेच नाहीतर, पुण्यात सुरू असलेल्या रोहित पवार यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी देखील बुलढाण्याच्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या डॉ. ज्योती खेडेकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत