बुलढाणा, 8 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत) : विश्वनाथ दिनकरराव पाटेकर अर्थात नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत… नाना नेहमी म्हणायचे मृत्यूनंतर हे माणूस आपल्या कामाने जिवंत राहू शकतो… त्यांनी आयुष्यभर जात-धर्म, गरीब-श्रीमंत पाहिला नाही… पाहिला केवळ ‘माणूस’ आणि जपली माणूसकी… चित्रपट, रिऍलिटी शो, सोशल मीडिया, जाहीर कार्यक्रम, मुलाखती, चर्चा यातून नाना आपल्याला भेटत राहिले पण बुलढाणेकरांनी नाना पाटेकर यांना प्रत्यक्ष आपल्या शहरात अनुभवलं… 11 वर्षांपूर्वी नाना पाटेकर बुलढाण्यात मुक्कामी आले होते…निमित्त कोणतं ते पुढे वाचा…
महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर 2015 मध्ये नाम फाउंडेशन ची स्थापना केली. या अंतर्गत 25 ऑक्टोबर 2015 रोजी दोघेही बुलढाण्यात शेतकऱ्यांना मदतीसाठी आले होते. बुलडाणा, अकोला व वाशिम येथील 137 आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांना मदतीचे वाटप करण्यासाठी ते बुलडाण्यात आले होते.
गर्दे हॉल मध्ये अत्यंत संवेदनशील वातावरणामध्ये हा कृतज्ञता सोहळा अनेकांच्या हृदयांमध्ये संवेदना करून गेला होता . शेतकरी विधवा महिलांची हुंदके.. मुला मुलींचे गालावरून उघडणारे अश्रू नाना मकरंद यांचा वडीलकीचा आधार, ॲड. हरीश इथापे यांचा समन्वय आणि संयोजक ॲड. विजय सावळे, ॲड. दीपक पाटील, ॲड. राजेश लहाने व सिम्बॉयसिस ग्रुपचा सद्भाव अशा सामाजिक तेने भारावलेला सोहळा हजारो बुलढाणा करांनी त्यावेळी अनुभवला होता. या सोहळ्याचे सूत्रसंचालन तेवढ्याच धीर गंभीरतेने गुड इव्हिनिंग सिटी चे संपादक रणजीतसिंग राजपूत यांनी केले होते. गुड इवनिंग सिटीने आपल्या अंकामध्ये या कृतज्ञता सोहळ्याला विशेष कव्हरेज दिले होते. (सर्व फोटो : रविकिरण टाकळकर).
तत्पूर्वी एक पत्रकार परिषद झाली होती. त्यात नाना पाटेकर यांनी व्यक्त केलेल्या करुणामयी भावना याठिकाणी देत आहोत.
सामाजिक बांधीलकी हा शब्द गुळगुळीत झाला आहे.. मरेपर्यंतच्या आयुष्य जगण्यासाठी कोणते ना कोणते कारण हवेच.. मग आपण काय करतोय ? याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. छप्पर पुरेसे असतांना आपण भिंती उभ्या करित आहोत. त्या भिंतीमुळे बाहेरच जग आता दिसेनासं झाल आहे. चला चार भिंतीच्या पलिकडे जाऊया. आपली संस्कृती दातृत्वाची आहे…मनाची कवांड थोडी किलकिली करुन पहा ती आपोआप उघडतील. आत्महत्या करणार्या माणसांच्या अवती भोवती आपण त्यांच्या पाठीशी दिसलो, तर ती माणसं आत्महत्या करणार नाही… त्यांना आधार हवायं… आपल्या घरी कोणी गेला, तर त्याच दु:ख खूप मोठं असतं शेतकर्यांच्या विधवांना तर आशा फाटल्यागत स्थिती त्यामुळे कोणाच काय चुकलं या पेक्षा आपण काय करू शकतो, हे महत्वाचं…
शेतकर्यांच्या विधवांचे हे दु:ख मला बीड येथे जवळून समजले त्यासाठी काही तरी करावे लागणार आहे हे काम न संपणारे आहे, निदान दोन पिढ्यातरी दुसऱ्यांच्या कामी येता येणं हीच खरी श्रीमंती… माणूस सधन असला की नातेवाईक खूप असतात ते सधनतेचे नातेवाईक, विधवा बहिणी, मुले-मुली मला ‘नाम’मुळे मिळाल्यात.. तुमच्या सगळ्याच्या साथीने त्यांच्यासाठी काम करतांना आयुष्य जगतोय… आज कर्मचार्यांसाठी सहाव्या वेतन आयोगानंतर सातवा वेतन आयोग येतोय, चित्रपट जगतालाही उद्योगांचा दर्जा मिळाला मात्र शेतकर्यांच्या व्यवस्थेत उत्पादन आधारावर भाव मिळण्याची सोय देखील आपल्याकडे उपलब्ध नाही त्यांच्यासाठी कुठलाच महागाई भत्ता अजून तरी नाही, स्वामिनाथन चळवळीच्या शिफारशी लागू झाल्या नाहीत त्यामुळे आजच्या परिस्थतीला कोण जबाबदार असा प्रश्न सहाजिक पडू शकतो मात्र कोणाला नाव ठेवण्यात धन्यता मानण्यापेक्षा काही तरी चांगलं करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी नामच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.






Total Users : 1420063