बुलढाणा, 23 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : पोलीस दलातील तब्बल 51 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पदमसिंग राजपुत यांची बदली प्रभारी अधिकारी, पो.स्टे. अमडापुर, निखील बबनराव निर्मल प्रभारी अधिकारी पो.स्टे. धामणगाव बढे, रुपेश लक्ष्मणराव शक्करगे सिसिटीएनएस बुलढाणा, चंद्रकांत भरत पाटील वाचक, पो.अ. बुलढाणा व QRT पथक प्रमुख बुलढाणा, प्रविण अरुणराव लिंगाडे प्रभारी अधिकारी पो.स्टे. जलंब, दिपक दिनकराव ढोमणे प्रभारी अधिकारी, पो.स्टे. अंढेरा, युवराज धनराज रबडे प्रभारी अधिकारी, पो.स्टे. साखरखेर्डा, गजानन पिराजी सोनटक्के प्रभारी अधिकारी पो.स्टे. बीबी, भरत विठ्ठराव चापाईतकर पो.स्टे. सिंदखेड राजा, राहुल पांडुरंग लोखंडे पो.स्टे. चिखली, हेमराज भगवान कोळी पो.स्टे. नांदुरा, आशिष नथुजी चेंचरे पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण, गजानन कोंडीबा कौळासे पो.स्टे. लोणार, शरद सजन माळी प्रभारी अधिकारी
पो.स्टे. जानेफळ, गणेश अशोक इंगोले प्रभारी अधिकारी, पो.स्टे. डोणगाव येथे बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप अन्नाजी गोंडाने नियंत्रण कक्ष बुलढाणा, नागेश रामदास जायले पो.स्टे. मलकापुर शहर, अजिनाथ ओंकार मोरे प्रभारी अधिकारी पो.स्टे. धाड, संदिप शिवाजी बिरांजे दोषसिध्दी विभाग व डायल-११२, राजेन्द्र दशरथ पवार पो.स्टे. शेगाव ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.
बुलढाणा पोलीस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या १० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रविण रामकृष्ण सुळे अर्जशाखा, पो.अ. कार्यालय, देविदास आत्माराम पाटील पो.स्टे. मलकापुर शहर, सुनिल अरुण इंगळे स्थागुशा बुलढाणा, मनोज विलासराव वासाडे पो.स्टे. तामगाव, सविता जगन्नाथ कुवारे पो.स्टे. देऊळगाव राजा, वैभव ज्ञानेश्वर महांगरे वाचक, अ.पो.अ. बुलढाणा, प्रदिपकुमार नवलचंद राठोड पो.स्टे. मेहकर, संजीवनी विजय पुंडगे अनैतीक मानवी वाहतुक कक्ष बुलढाणा, गजानन प्रभाकर रहाटे पो.स्टे. खामगाव शहर, मल्लीकार्जुन गोरख वाघमोडे पो.स्टे. बुलढाणा शहर येथे बदली करण्यात आली आहे.
बुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या तब्बल १० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रावसाहेब विनायक बुधवंत वाचक, उपवि.पो.अ.मलकापुर, विजय मुरलीधर अजमिरे पो.स्टे. डोणगाव, विजय रामराव पाटील नियंत्रण कक्ष बुलढाणा, गणेश दिनकर कायंदे पो.स्टे. जळगाव जामोद, अख्तर सत्तार शेख पो.स्टे. मलकापुर शहर, श्रीराम शिवदास जाधव वाचक, उपवि.पो.अ. बुलढाणा, अरुण दिनकर मुंढे पो.स्टे. पिंपळगाव राजा, राजू अशोक मोरे पो.स्टे. तामगाव, प्रविण श्रीराम मोरे पो.स्टे. चिखली, शेख इद्रीस शेख नासीर कल्याण शाखा, बुलढाणा बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक निजाम कासम तांबोळी, विजय यादवराव हुडेकर व राजेश नारायण गोमासे यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन देविदास शिंदे पो.स्टे तामगाव, किशोर पुरुषोत्तम बर्वे पो.स्टे. खामगाव शहर, जीवन विठ्ठलराव सोनवणे पो.स्टे. जळगाव जामोद, अमोल अवधुत पंडीत पो.स्टे. खामगाव शहर, कुणाल दिलीप जाधव पो.स्टे. मलकापुर शहर, विलास ज्ञानेश्वर बोपटे पो.स्टे. मलकापुर ग्रामीण, नितीनसिंह सुरेशसिंह चौहाण पो.स्टे.धाड, नारायण निवृत्ती सरकटे पो.स्टे. तामगाव येथे बदली करण्यात आली आहे.



