spot_img

काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेप

काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेप

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय महत्वपूर्ण निकाल
बुलढाणा, १४ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) शेतीच्या क्षुल्लक वादातून स्वतःच्याच सख्ख्या काकावर धारदार चाकूने वार करून त्यांचा खून करणाऱ्या आरोपीला बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीला १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, दंडाच्या रक्कमेपैकी ८ हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्रीचंद दौलतराम जगमलानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलढाणा यांनी हा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिला. मिळालेल्या माहितीनुसार, घटना २९ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मौजे कुंभेफळ (गट नं. २६) येथील शेतात घडली. फिर्यादी विलास शेषराव जाधव रा. कुंभेफळ आणि त्यांचे वडील मयत शेषराव रामा जाधव हे शेतात काम करत असताना, अचानक शेषराव यांच्या ओरडण्याचा आवाज आला. विलास मदतीसाठी धावला असता, दादाराव पंडित जाधव व आशा साईनाथ बडगुजर यांनी शेषराव यांना पकडून ठेवले होते, तर मुख्य आर-पी समाधान पंडित जाधव हा हातातील धारदार चाकूने शेषराव यांच्या पोटात, छातीवर व दोन्ही पायांवर सपासप वार करत असल्याचे दिसून आले.
गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेषराव जाधव यांचा या हल्यात मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी समाधान जाधव याने स्वतः धाड पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, रक्ताने माखलेला शर्ट जाळण्यासाठी त्याची आई आनंदाबाई यांच्याकडे दिला होता, जो शेतातील बांधावर जाळल्याचे आढळले.
फिर्यादी विलास जाधव यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धाड येथे भा.दं.वि. कलम ३०२, २०१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी यांनी आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला. तसेच जप्त मुद्देमाल रासायनिक विश्लेषणासाठी अमरावती येथे पाठवण्यात आला होता. अहवालात आर-पीच्या कपड्यांवर व चाकूवर मयताचेच रक्त असल्याचे सिद्ध झाले.
न्यायालयात खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे प्र. जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, पंच, डॉक्टर आणि तपास अधिकारी पो.नि. अनिल पाटील यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि भक्कम पुरावे लक्षात घेता, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी आरोपी क्र. १ समाधान पंडित जाधव यास भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व १० हजार रुपये दंड सुनावला. तर आरोपी दादाराव जाधव, आशाबाई बडगुजर व आनंदीबाई जाधव यांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे तर्फे प्र. जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी का केले. काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून पि.एस.आय. रमेश चव्हाण यांनी सहकार्य केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत