spot_img

डॉ. शिंगणे- खा. प्रतापराव यांच्या पॅनलच्या विरोधात आ. मनोज कायंदे यांनी दंड ठोकले !

आता जिल्हा बँक निवडणूक अटळ

बुलढाणा, 11 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : दि. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे यासाठी खामगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली पण ती बैठक निष्फळ ठरताना दिसून येत आहे. माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे उमेदवार सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे. तर त्यांच्या विरोधात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांचे अजितदादा पवार शेतकरी पॅनल असणार आहे. तब्बल 17 वर्षांनी होणारी ही निवडणूक आता रंजक वळणावर आली आहे. सुरूवातीला बिनविरोध वाटणाऱ्या निवडणुकीने वळण घेतले आहे. 19 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
संचालक पदांसाठी २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. उद्या १२ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आता कोणाचा अध्यक्ष होणार याकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत