spot_img

सागवनकरांच्या हक्काचा… देवाभाऊ

सागवनकरांच्या हक्काचा… देवाभाऊ

साईनगर मधील साचलेल्या पाण्याची सोडवली समस्या

बुलढाणा, 13 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : शहराच्या लगतच असलेल्या सागवान ग्रामपंचायतचे सरपंच देवानंद दांडगे यांनी नेहमीच कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. सरपंच पदावर असताना गावाचा विकास व नागरिकांच्या समस्या यांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. बुलढाणा शहराचाच भाग बनलेल्या सागवन ग्रामपंचायतला मोठे विस्तारित स्वरूप प्राप्त झाले आहे. धाड रोड, नांद्राकोळी रोड, गायरान, राजेश्वर नगर, व्दारका नगर, धाड नाका व इंदिरा नगरचा काही भाग येत असल्याने सर्व भागात देवानंद दांडगे हे लक्ष ठेवून असतात. सागवान परिसरातील साईनगर येथे वराडे यांच्या घराशेजारील खालील प्लॉटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांची ही समस्या लक्षात येताच सरपंच देवानंद दांडगे यांनी तत्काळ दखल घेतली.
जेसीबी व मजुरांच्या साहाय्याने नाली तयार करून त्यामध्ये पाईप टाकण्यात आले आणि साचलेल्या सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, साईनगरमधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचा प्रयत्न सरपंच देवानंद सिताराम दांडगे यांच्या वतीने करण्यात आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत