spot_img

परदेशातून डिग्री घेतलेल्या बुलढाण्यातील दोन बोगस डॉक्टरांना मुंबईत अटक! ◾ बनावट FMGE प्रमाणपत्राद्वारे महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या वेबसाईटवर नोंदणी केल्याचा आरोप

अटक केलेल्याबुलढाणा, 6 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत ) : परदेशातून वैद्यकीय शिक्षण (MBBS) पूर्ण करून भारतात परतल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली **FMGE (Foreign Medical Graduate Examination)** परीक्षा उत्तीर्ण न करताच बनावट प्रमाणपत्राच्या आधारे महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC)च्या वेबसाईटवर अवैध नोंदणी केल्याप्रकरणी बुलढाण्यातील दोन डॉक्टरांना मुंबई सायबर पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये डॉ. संकेत प्रभाकर उन्हाळे आणि डॉ. वरुण प्रतापराव आखाडे यांचा समावेश आहे. हे दोन्ही विद्यार्थी बुलढाण्यातील एका शाळेत शिकलेले डॉक्टर उन्हाळे यांची मूळ गाव पळसखेड सपकाळ आहे तर आखाडे हे मेहकर तालुक्यातील असल्याचे समजते

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही डॉक्टरांनी परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. मात्र, भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली FMGE परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दर्शविणारे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याच्या आधारे महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

### देशव्यापी रॅकेटचा संशय

या प्रकरणामुळे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी राजस्थानसह अन्य राज्यांमध्येही परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या उमेदवारांनी FMGE परीक्षा उत्तीर्ण न होता कथितरित्या पैसे देऊन बनावट प्रमाणपत्रे मिळवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता व्यापक स्वरूपात होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा प्रकार केवळ नियमांचे उल्लंघन नसून त्याचा थेट संबंध रुग्णांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी आहे. अशा प्रकरणांकडे न्यायालयांनीही गांभीर्याने पाहिले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने यासारख्या एका प्रकरणात आरोपींना जामीन नाकारताना स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर बाबींवर भाष्य केले होते.

Fake FMGE Certificate Scam : काय आहे नक्की हे प्रकरण?

शासकीय आणि वैद्यकीय नियमांनुसार, परदेशातून वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय (Medical Practice) करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी ‘एफएमजीई’ (Foreign Medical Graduate Examination) ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. ही परीक्षा पास झाल्यानंतरच भारतातील वैधानिक वैद्यक परिषदेत (MMC) अधिकृत नोंदणीसाठी अर्ज करता येतो. मात्र, अटकेत असलेल्या या दोन डॉक्टरांनी ही कठीण परीक्षा पास न करताच, बनावट आणि खोटी एफएमजीई प्रमाणपत्रे तयार करून ती महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या वेबसाईटवर अपलोड केली आणि बेकायदेशीरपणे नोंदणी मिळवली.

वेबसाईटच्या तपासणीत उघड झाला बनावट प्रकार

महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या संकेतस्थळावर नियमित चाचणी आणि पडताळणी सुरू असताना, सुमारे 22 जणांच्या प्रमाणपत्रांमध्ये गंभीर संशय आणि तफावत आढळून आली. यानंतर एमएमसी प्रशासनाने तातडीने महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. 19 डॉक्टर अजूनही सायबर पोलिसांच्या रडारवर बनावट वैद्यकीय नोंदणीच्या या आंतरराज्यीय रॅकेट प्रकरणी सायबर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 3 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अद्यापही सुमारे 19 संशयित डॉक्टर महाराष्ट्र वैद्यक परिषद आणि सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत. या सर्व 19 जणांच्या प्रमाणपत्रांची अत्यंत सूक्ष्म पातळीवर तपासणी सुरू असून येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची आणि राज्यभरातून अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत