बुलढाणा, 29 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. एलसीबी हे जिल्हा पोलीस दलाचा कान, नाक आणि डोळा म्हणून ओळखले जाते. अंत्यंत महत्वाच्या एलसीबीची जबाबदारी ही पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्याकडे पूर्णवेळ देण्यात आली आहे. तर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांची बदली सायबर पोलीस स्टेशनला झाली आहे. सुनिल अंबुलकर यांच्या निलंबनानंतर एलसीबीचा अतिरिक्त प्रभार सांभाळत असलेले आशिष रोही यांच्याकडे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार हे आदेश २८ जुलै रोजी देण्यात आले आहेत. पोनि हेमंत ठाकरे यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखा प्रभार देण्यात आला आहे. सपोनि प्रताप भोस यांच्याकडे जिल्हा वाहतूक शाखेचा तात्पुरता प्रभार सोपवण्यात आला आहे. पोनि संग्रामसिंग पाटील सायबर पो.स्टे बुलढाणा यांच्याकडे बुलढाणा शहर पोलिस स्टेशनच्या ठाणेदार पदाची पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली आहे. ते सायबर प्रमुख होते. सोबतच त्यांना बुलढाणा शहरचा प्रभार देण्यात आला होता. एसपी तांबे यांनी संग्राम पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांना आता पूर्णवेळ बुलढाणा शहर पोलिस स्टेशनची नियुक्ती दिली आहे. बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांची बदली सायबर पो.स्टे. व अतिरिक्त कार्यभार कल्याण शाखा येथे करण्यात आली आहे. पोनि श्रीकांत निचळ यांच्याकडे पो.स्टे. तामगाव ठाणेदार येथे बदली करण्यात आली आहे. पोनि देविदास दादाराव इंगोले पासपोर्ट शाखा, येथे तर पोनि सचिन बागुल यांची पो.स्टे. जळगाव जामोद ठाणेदार, एलसीबीचा प्रभार सांभाळत असलेले आशिष रोही यांच्याकडे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाची सूत्रे देण्यात आली आहे. पोनि रवि राठोड यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा व अतिरिक्त कार्यभार पोलीस उप अधीक्षक मुख्यालय येथे करण्यात आली आहे.




