spot_img

क्रेन अंगावरून गेल्याने वृद्ध गंभीर

बुलढाणा, 6 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : येथील खामगाव मार्गावर एका वृद्धाच्या अंगावरून क्रेन गेल्याने ते गंभीर झाल्याची घटना आज आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली.सकाळी घडली. साखरखेर्डा येथील 60 वर्षीय दशरथ नारायण लिंगायत हे आज बुलढाण्यात आले होते. खामगाव मार्गावर संत तुकाराम अर्बन बँकेजवळ नाईक क्रेन सर्व्हिसची एक क्रेन या वृद्धाच्या खेटून गेली. त्यांना धक्का लागून ते रस्त्यावर पडले. यातच क्रेन त्यांच्या दोन्ही पायावरून गेली. घटनास्थळी उपस्थित सागवन सरपंच देवा दांडगे यांच्या समवेत इतर लोकांनी ऍम्ब्युलन्स बोलावून वृद्धाला उपचारासाठी पाठविले. गंभीर अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आल्याचे समजते. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत