spot_img

बुलढाणा पुलिस के चंगुल से बचना नामुमकीन है !! रुग्णालयातून फरार झालेला आरोपी सहा तासात जेरबंद

बुलढाणा, 7 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : त्याला वाटलं होतं की, आपण सहजासहजी पळून जाऊ आणि पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडणारच नाही परंतु तो याबाबतीत अनभिज्ञ होता की, बुलढाणा पोलिसांचे नेतृत्व एसपी निलेश तांबे करीत आहेत. रुग्णालयातून फरार झालेल्या या मलकापूरच्या आरोपीस अवघ्या 6 तासात जेरबंद करण्यात आले आहे. एसपी श्री तांबे यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकाने जळगावच्या दिशेने निघालेल्या या आरोपीस सिनेस्टाईल ताब्यात घेतले.

पोलिसांना गुंगारा देऊन बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या टॉयलेटमधून एक आरोपी फरार झाल्याची पहिली ब्रेकिंग गुड इव्हीनिंग सिटीने आपल्या वाचकांना दिली होती.
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी बावरी फरार झाला होता. मलकापूर दसरखेड एमआयडीसी पोलिसांची झोप आज पहाटे 3:30 वाजेपासून उडाली होती. बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना मलकापूरच्या आरोपीने पलायन केले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल, रविवारी एमआयडीसी परिसरामध्ये तार चोरतांना आरोपी प्रताप सिंग सुरज सिंग बावरी वय 19 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी मलकापूर आणि कपूरसिंग सूरजसिंग बावरी वय. 24 या दोघांना
या दोघांना पकडले होते. यांना बेदम चोप देण्यात आला होता. आरोपींविरोधात मलकापूर एमआयडीसी पोलिस स्टेशनला अप क्रमांक 109/26 कलम 303(2),3(5) BNS 2023 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी आणले होते. डॉक्टरांनी दोघांना भरती करून घेतले होते. सर्वजण झोपेत असताना एक आरोपी प्रतापसिंग बाबरी याने पहाटे 3 वाजता टॉयलेटला जातो सांगून टॉयलेटची खिडकी तोडून फरार झाला होता. आरोपी फरार झाल्याचे समजल्यावर एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती.

सदर माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे स्वतः रात्री फिल्डवर होते. त्यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली आरोपी शोधासाठी विशेष मोहीम राबवली गेली. नमूद आरोपी याचा गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे शोध सुरू केला. आरोपी जळगावच्या दिशेने गेल्याचा प्राथमिक अंदाज आल्याने कोणताही वेळ न दवडता मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये एलसीबीच्या टीमने आरोपींचा पाठलाग सुरू केला.
नमूद आरोपी दीपनगर भुसावळ येथे मोटार सायकल वर त्याचा भाऊ तुफानसिंग सूरजसिंग बावरी वय.19 वर्ष रा. म्हाडा कॉलनी मलकापूर याच्या सोबत पळून जातांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे. सदर पळून गेलेल्या आरोपीस अवघ्या सहा तासात पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या आरोपीच्या भावा विरोधात सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या आरोपीस पुन्हा पकडण्यात यश आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत