spot_img

दर्पणकार स्व. सोमनाथजी सावळे पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा 14 ऑक्टोबरला

◾ ज्येष्ठ पत्रकार नितीन शिरसाट यांना जीवनगौरव, रणजितसिंग राजपूत यांना उत्कृष्ट तर अभिषेक वरपे यांना युवा पत्रकारिता पुरस्कार घोषित

बुलढाणा, 11 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : मूल्याधिष्ठित, संस्कारित आणि समाजसमर्पित पत्रकारितेचा आदर्श जपणारे दर्पणकार स्व. सोमनाथजी सावळे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त बुलढाणा येथे बुधवार, 14 ऑक्टोबर 2026 रोजी पुण्यस्मरण तथा पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ तथा ‘दर्पणकार स्व. सोमनाथजी सावळे पत्रकारिता पुरस्कार निवड समिती’ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नितीन शिरसाट यांना ‘दर्पणकार स्व. सोमनाथजी सावळे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रणजितसिंग राजपूत यांना दर्पणकार स्व. सोमनाथजी सावळे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’, तर युवा पत्रकार अभिषेक वरपे यांना ‘दर्पणकार स्व. सोमनाथजी सावळे युवा पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पत्रकारितेतील निष्ठा, सामाजिक बांधिलकी, निर्भीड विचार आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. तसेच बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे संचलन ज्येष्ठ पत्रकार रविकिरण टाकळकर करणार असून, प्रास्ताविक बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या महिला अध्यक्ष अॅड. मृणाल सुरेखा सोमनाथ सावळे मांडणार आहेत. समन्वयक म्हणून डॉ. श्रुती सुरेखा सोमनाथ सावळे भूमिका बजावणार आहेत

पुण्यस्मरण सोहळ्याच्या माध्यमातून स्व. सोमनाथजी सावळे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पत्रकारितेतील ज्येष्ठांचे योगदान अधोरेखित करत नव्या पिढीतील पत्रकारांच्या कार्यालाही प्रोत्साहन मिळणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता पत्रकार भवन, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत